Home शासकीय ‘सहकारी गृहनिर्माण संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त अभियान’ विषयावर सोमवारी कार्यशाळेचे आयोजन

‘सहकारी गृहनिर्माण संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त अभियान’ विषयावर सोमवारी कार्यशाळेचे आयोजन

0 second read
0
0
169

no images were found

सहकारी गृहनिर्माण संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त अभियानविषयावर सोमवारी कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर :  ‘सहकारी गृहनिर्माण संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त अभियान’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र, शाहू मार्केट येथे होणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

ही कार्यशाळा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेमध्ये उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था संघाचे अध्यक्ष प्रा.एस.टी.जाधव मार्गदर्शन करणार आहेत. शहारातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. जगताप यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…