विक्रम हायस्कूल येथे बालदिन उत्साहात. कोल्हापूर (प्रतिनिधी): भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती. आज 14 नोव्हेंबर संपूर्ण भारतभर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवाजी पार्क येथील विक्रम हायस्कूल प्राथमिक शाखा,कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहाने बालदिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्तने कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद नाझरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ साक्षी कांबळे मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या,तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. आनंदा हिरुगडे सर यांच्या शुभ हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये श्री. विनोद नाझरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की आज मी माझ्या भाग्याचा हेवा करतो की मला भारतासारख्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या अशा कार्यक्रमाच्या वेळी मला प्रमुख पाहुणे म्हणून संधी मिळाली त्याबद्दल मी शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापकांचे आभार व्यक्त करतो. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या .कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी सुशांत कांबळे व श्री.आनंदा ज्ञानू हिरुगडे यांनीही मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे नियोजन श्री. दयानंद बापू खाडे यांनी केले. श्री. किरण नामदेव ठोंगीरे यांनी आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमास श्री. छत्रू गणपत राठोड त्याचबरोबर बालवाडीच्या शिक्षिका रेखा अप्पासो क्षीरसागर शाळेचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बालदिन निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी टाटा मोटर्स यांच्या कडून विद्यार्थ्यांसाठी रंगपेटी व अपेक्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका अंजली मॅडम यांनी केळी व जिलेबीचे वाटप केले.सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून विक्रम एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षा अरुणा देशमुख मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना ढोकळा व बटाटा चिप्स चेही वाटप करण्यात आले त्यावेळी मा.श्री बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.