इकोफ्रेंडली शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापूर : येथील मंगळवार पेठमधील कोष्टी गल्ली मध्ये राहणाऱ्या महेश, संतोष आणि विपुल शरद महाडिक या तीन बंधूंनी मिळून केलेली गणपतीची आरास वैविध्यपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारच्या डिजिटल बोर्ड अथवा प्लास्टिकचा वापर न करता फक्त कागदाचा वापर करून शिवराज्याभिषेक सोहळ्याची आरास केलेली आहे. यामध्ये ८ इंच उंचीचे ८ घोडेस्वार, १२ इंच उंचीचे ३ हत्ती, माहूत, १२ इंच उंचीचे …