no images were found
इकोफ्रेंडली शिवराज्याभिषेक सोहळा
कोल्हापूर : येथील मंगळवार पेठमधील कोष्टी गल्ली मध्ये राहणाऱ्या महेश, संतोष आणि विपुल शरद महाडिक या तीन बंधूंनी मिळून केलेली गणपतीची आरास वैविध्यपूर्ण आहे.
कोणत्याही प्रकारच्या डिजिटल बोर्ड अथवा प्लास्टिकचा वापर न करता फक्त कागदाचा वापर करून शिवराज्याभिषेक सोहळ्याची आरास केलेली आहे. यामध्ये ८ इंच उंचीचे ८ घोडेस्वार, १२ इंच उंचीचे ३ हत्ती, माहूत, १२ इंच उंचीचे सुवर्ण सिंहासन, ८ इंच उंचीचे ८० मावळे, ७२ X २४ इंच साईजची मागील राजमहालची आरास तसेच महाद्वार व दगडी दर्शनी बुरुज हीसुद्धा संपूर्ण कागदापासून बनविलेले आहे.
अत्यंत सुरेख असलेला हा शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे.