no images were found
चीनमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
आज चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात (सोमवारी) 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राकडून समजली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये यानला मोठा भूकंप होऊन १०० पेक्षा जास्त लोक ठार व हजारो जखमी झाले होते. आत्ताच्या भूकंपामुले कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.
सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या आग्नेयेला सुमारे 43 किलोमीटर (26 मैल) 10 किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाल्याचे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणात नोंद केले आहे. सिचुआनची राजधानी चेंगडूच्या नैऋत्येस सुमारे 180 किमी (111 मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले असून भूकंपाचे केंद्र लुडिंग शहरात 16 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती भूकंप नेटवर्क केंद्राकडून मिळाली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.