Home शासकीय  १५ व १६ मार्च २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू परिषदेचे आयोजन

 १५ व १६ मार्च २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू परिषदेचे आयोजन

32 second read
0
0
65

no images were found

 १५ व १६ मार्च २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू परिषदेचे आयोजन
                                                                                            कोल्हापूर -राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठ विविध उपक्रम राबवीत आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्र आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ व १६ मार्च २०२३ रोजी ‘राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेचे’ आयोजन केले आहे. या परिषदेला उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. तर बीजभाषक म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर (भारतीय अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत) हे मार्गदर्शन करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के असणार आहेत. या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत अभ्यासकांना निमंत्रित केले आहे. त्यामध्ये डॉ. यशवंतराव थोरात, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. तारा भवाळकर, श्री. लक्ष्मीकांत देशमुख, प्राचार्य आनंद मेणसे इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. तरी सर्व शाहूप्रेमींनी सदर परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शाहू संशोधन केंद्राचे समन्वयक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे.-

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…