
no images were found
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – डॉ. अरुण भोसले
भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि इतिहास अधिविभाग, छ. शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञात-अज्ञात नायक’ असा होता. या चर्चासत्राचे प्रास्ताविक छ. शाहू संशोधन केंद्राच्या समन्वयिका डॉ. निलांबरी जगताप यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातंर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन चर्चासत्राचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. उद्घाटक व अध्यक्ष असलेले विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.