
no images were found
विभागीय रोजगार मेळावा
कोल्हापूर:कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.14मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, बिंदू चौक, कोल्हापूर येथे ‘विभागीय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.
यामेळाव्याचा जास्तीतजास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उप आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 15 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 1500 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.