no images were found
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा दाखवत सामूहिक अत्याचार; ६ जण पोलिसांनी ताब्यात
पूणे : येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६ जणांना चतुर्श्रुंगी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुलै ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली आहे.
फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचं माहिती असतानाही आरोपींपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत इतर आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती अल्पवयीन मुलीने घरी दिल्यानंतर घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चतुर्श्रुंगी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालले आहे. त्यात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना जास्त आहेत. त्यातच आता पुण्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुणे हादरले आहे.