no images were found
PM नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल; पंतप्रधान अहमदाबाद जाणार
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. २७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी आली होती. थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला दाखल होणार आहेत. यामुळेच मेहता रुग्णालयातबाहेर गर्दी देखील वाढली आहे.
हिराबेन मोदींनी या वर्षी जूनमध्ये त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. यानंतर पीएम मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती. पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त असल्याने आरोग्याबाबत अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फक्त भरतीबद्दल माहिती दिली आहे आणि हिराबेनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पीएम मोदींनी मेहता रुग्णालयाला भेट दिली होती. या रुग्णालयातील नव्या सुविधांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. गुजरात विधानसभेत भाजपचा विजय झाल्यानंतर मोदींनी राज्याला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी आई हिराबेन यांची देखील भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावरून ते थेट निवासस्थानी गांधीनगर येथे घरी गेले होते. ४५ मिनिटे आईची भेट घेऊन मग ते पक्ष कार्यालयात गेले होते.