no images were found
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात कॉण्टेंपोररी नृत्य कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक 20, 21 व 22 ऑगस्ट रोजी कॉण्टेंपोररी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात होणार असून या कार्यशाळेसाठी ‘शोवन दास’ (बांग्लादेश) हे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवस होणार्या या कार्यशाळेसाठी तीनशे रुपये इतकी रजिस्ट्रेशन फी असेल. या कार्यशाळेत बॉडी अवेयरनेस, फिजिकल अँड मेंटल बॉडी , कॉण्टेंपोररी डान्स फ्रेजेस, ब्लॉकींग, बेसिक ब्यालेट डान्स प्रॅक्टिस, क्रियेटिंग मूव्हमेंट, फ्लोअर वर्क, मेडिटेशन इन डांस इत्यादी विषयांबद्दल मार्गदर्शन लाभणार आहे. तरी कॉण्टेंपोररी नृत्य प्रकाराची माहिती व मार्गदर्शन मिळविण्यासाठी या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हाहन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्र. विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकुरदेसाई यांनी केले आहे.