no images were found
सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूर शिक्षण केंद्रात प्रवेशाची संधी : डॉ. कृष्णा पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात प्रवेशाची संधी असल्याचे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिये बाबत बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव कातेतकर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या उदबोधन कार्यशाळेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील होते. यावेळी खजिनदार श्री प्रकाश मरगळे, खानापूर तालुका मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सदस्य गोपाळराव पाटील,प्राचार्य डॉ. एस. एन.पाटील उपस्थित होते. डॉ. कृष्णा पाटील म्हणाले, नोकरी व व्यवसाय सांभाळून महिला, विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक, कामगार यांना दूर शिक्षण केंद्राच्या एकूण १३ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होता येते. प्रवेशासाठी दुहेरी पदवीची सोय असून अभ्यासासाठी दर्जेदार स्वयं अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.शिवाय विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शनाबरोबर शैक्षणिक आणि करियर विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी,शासकीय व निम शासकीय नोकरदार यांना शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे.याचा फायदा सीमा भागातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी घ्यावा. यावेळी सहाय्यक प्रा.डॉ. सचिन भोसले यांनी दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाबद्दल व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्जाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.एन. पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉ.एम.व्ही. शिंदे यांनी यांनी केले तर आभार डॉ. एम.एस.पाटील यांनी मांनले.