
no images were found
दूर शिक्षण केंद्रात समन्वयक व लेखनिकांची कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील 86 महाविद्यालयांच्या दूरशिक्षण अभ्यास केंद्रातील समन्वयक व लेखनिकांसाठीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीची प्रवेश प्रक्रिया माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा दूरशिक्षण केंद्राच्या मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी उपकुलसचिव श्री. व्ही. बी. शिंदे होते.
या कार्यशाळेमध्ये उपकुसचिव श्री.व्ही.बी.शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहे तसेच या केंद्राने ऑनलाइन एम.बी.ए. हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.त्याचाही फायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या नव्या बदलासाठी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी संगणक चालक श्री. विकास मोहिते यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे बाबत माहिती देऊन समन्वयक लेखनिक यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच सहा. प्रा.डॉ. मुफिद मुजावर यांनी ए.बी.सी.आयडी व D.E.B.तयार करणे बाबत व दुहेरी पदवी अर्ज करणे बाबत प्रात्यक्षिक सादर केले. तसेच अभ्यास केंद्राच्या कामकाजाबाबत समन्वयक डॉक्टर के.बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी सहाय्यक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, कक्ष अधिकारी महेश साळोखे, विश्वनाथ वरुटे,आय.टी. विभागातील सिस्टीम ऑपरेटर राजेंद्र आंदरगिसके, मिलिंद सुरुलकर, सनद आडमुठे, अमोल आडगुळे,सर्व सहा. प्राध्यापक व अभ्यासकेंद्रातील 53 हून अधिक समन्वयक व लेखनिक उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ.के.बी. पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सहा. प्रा. डॉ.नितीन रणदिवे यांनी केले व आभार डॉ. चांगदेव बंडगर यांनी मांडले.