Home मनोरंजन झ्विगॅटोसाठी कपिल शर्माने झारखंडी शब्दोच्चार उत्तमपणे आत्मसात केले – नंदिता दास

झ्विगॅटोसाठी कपिल शर्माने झारखंडी शब्दोच्चार उत्तमपणे आत्मसात केले – नंदिता दास

2 second read
0
0
62

no images were found

झ्विगॅटोसाठी कपिल शर्माने झारखंडी शब्दोच्चार उत्तमपणे आत्मसात केले – नंदिता दास

द कपिल शर्मा शोवर हास्याचा धबधबा कोसळणार आहे. होस्ट कपिल शर्मा हा आपल्या आगामी झ्विगॅटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक अतिथी म्हणून शोमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटाच्या दिग्दर्शक तथा समीक्षकांनी वाखाणलेल्या नंदिता दास, सहकलाकार शहाना गोस्वामी हेही शोमध्ये येत आहेत. हास्यविनोदाचा डबल डोस देत एका सेगमेंटसाठी राजीव ठाकूर हा शोच्या होस्टच्या भूमिकेत शिरणार आहे. या वेळी तो मित्र आणि सहकलाकार कपिल शर्माला प्रश्नही विचारणार आहे.

आपला अस्सलपणा आणि कळकळीत अपिलमुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत झ्विगॅटोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाबाबत बोलताना नंदिता दास यांनी बरीच माहिती दिली. अस्खलित झारखंडी शब्दोच्चार बोलता यावेत कपिल शर्मा त्याच्या कम्फर्ट झोनच्या कसा बाहेर पडला, त्याने त्याच्या पात्राला कसा न्याय दिला, याबाबत त्या म्हणाल्या, “या चित्रपटात कपिल हा एका नव्या अवतारात दिसणार आहे. ते त्याच्या नेहमीच्या पंजाबी शब्दोच्चार शैलीऐवजी झारखंडी बोलीभाषेत बोलताना दिसणार आहे. त्याच्या झारखंडी शब्दोच्चार शैलीबाबत सुरुवातीला मला जरा काळजी वाटत होती. मी निवडलेल्या उच्चारशैलीत संवाद योग्यरीतीने बोलता येत नसतील तर मी त्याच्यासमोर त्याच्या पंजाबी उच्चारांत ते बोलण्याचा पर्याय ठेवला होता. मात्र, त्याने तत्काळ माझा प्रस्ताव नाकारून लावला. तुम्ही जी शब्दोच्चार शैली निवडलेली आहे, त्यातच मी माझे संवाद म्हणेल, असे त्याने सांगितले. हे संवाद मूळ शैलीतच बोलण्याचे किती महत्त्व आहे, याची त्याला जाणीव होती. अतिशय सुरेखपणे झारखंडी शब्दोच्चार शैलीचा अंगिकार करून तो त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडला.“

इतकेच नव्हे तर अर्चना यांनीही कपिलची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “हॅट्स ऑफ टू कपिल. या कॉमेडी शोसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून तो होस्ट आणि एक विनोदी अभिनेता म्हणून वावरला आहे. मात्र या चित्रपटात तो जी भूमिका निभावत आहे, ती खूपच वेगळी आहे. त्याच्यासाठी हे तर सर्वस्वी नवे विश्व होते. त्याने ते अत्यंत नैसर्गिकरीत्या आणि सुरेखपणे चितारले. खरोखरीच मला त्याचा खूप अभिमान वाटतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…