no images were found
सुप्रीम कोर्टाची धार्मिक नावांच्या वापरावरावरून निवडणूक आयोगाला नोटीस
राजकीय पक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या धार्मिक नावांच्या आणि चिन्हांच्या नावाबाबत कठोर पावलं उचलली असून, न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. धार्मिक नावं आणि चिन्हं वापरल्याबद्दल राजकीय पक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षे घेण्यात आला होता. वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे.