
no images were found
भारती फौंडेशन आयोजित मनस्वी महिला मेळावा
कोल्हापूर : भारती फौंडेशन कोल्हापूर आयोजित महिला मंचतर्फे भव्य असा महिला मेळावा ९ ऑक्टोंबर रोजी शुभंकरोती सांस्कृतिक हॉल, मंगळवार पेठ येथे आयोजित केलेला असून त्यासाठी प्रत्येकी सभासद शुल्क ५००/- रु. आहे. या मेळाव्यात आकर्षक भेटवस्तू, फैशन शो, सोलो डान्स, ग्रुप डान्स, गायन, एकांकिका, सेलिब्रेटीशी गप्पा, होम मिनिस्टरशी स्पर्धा असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच या मेळाव्यात लकी ड्रौमध्ये पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तसेच या मेळाव्यात १६ वर्षावरील सर्व महिलांना भाग घेता येणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी भारती फौंडेशन कोल्हापूर या संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच १६/९/२०२२ रोजी शिवाजी मंदिर कोल्हापूर येथे दुपारी ३ ते ८ या वेळेमध्ये महिलांसाठी झिम्मा-फुगडीचे आयोजन करण्यात आले आहे. झिम्मा-फुगडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मानसी १००/- रु. शुल्क आकारणी ठेवण्यात आलेली आहे.
भारती फौंडेशनतर्फे व्हिजन स्कॉलरशीप स्पर्धा एप्रिल ते मे दरम्यान घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवेश फी रु. ३००/- ठेवण्यात आली आहे. ईयत्ता पहिली ते चौथीसाठी प्रथम रु. ५०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह, द्वीतीय रु. ३०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तसेच तृतीय रु. १०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. ईयत्ता पाचवी ते अकरावीसाठी प्रथम रु. १०,०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह, द्वीतीय रु. ६०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तसेच तृतीय रु. ३०००/- रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत पहिली ते अकरावी या वयोगटातील विध्यार्थानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी फौंडेशनतर्फे निमंत्रण देण्यात येत आहे.
यावेळी फौंडेशनच्या अध्यक्षा मनीषा इंगवले, प्रियांका पाटील, स्नेहल कारेकर, स्वरा माने, अंजना तुंगे, पूनम चोपडे, रीना सनगत या उपस्थित होत्या.