Home शासकीय नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण

0 second read
0
0
78

no images were found

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण

देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ भारतीय नौदलात सामील झाली आहे, यामुळे भारताची सागरी ताकद वाढली आहे. केरळमधल्या कोचीमध्ये भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. आज भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं, याचाच सन्मान म्हणून नौदलाच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रेच्या आकाराची आकृती काढण्यात आली आहे. या ध्वजाचं छत्रपती शिवाजी महाराजांशीही एक खास कनेक्शन आहे. आपण गुलामीतून मुक्त झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करत असताना हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे.

सध्याच्या ध्वजामध्ये सेंट जॉर्जचा क्रॉस लावण्यात आला होता. तसंच एका कोपऱ्यामध्ये तिरंगाही लावण्यात आला होता. मात्र जुन्या ध्वजामध्ये तिरंग्याऐवजी युनियन जॅक लावण्यात आला होता. १५ ऑगस्ट १९४७ नंतर (स्वातंत्र्यानंतर) भारतीय सुरक्षा दलांनी ब्रिटीश कालीन ध्वजच पुढे ठेवले होते. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी प्रथमच या ध्वजामध्ये बदल झाले. त्यामध्ये युनियन जॅकऐवजी तिरंगा लावण्यात आला होता. सेंट जॉर्ज यांचा रेड क्रॉस मात्र तसाच होता. त्यानंतर ठराविक कालावधी नंतर दोनवेळा या ध्वजात बदल करण्यात आले. २०१४ मध्ये या ध्वजामध्ये सत्यमेव जयते ही ओळही लिहिण्यात आली होती.

या नव्या ध्वजामधून मात्र ब्रिटीशांच्या सर्व खुणा हटवण्यात आल्या असून सध्या या ध्वजावर संपूर्णपणे भारतीय छाप असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. हा नवा ध्वज आपण भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचेही मोदींनी व्यक्त केले. भारतीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत हा नवा ध्वज सेनेचं आत्मबल आणि आत्मसन्मानाला नवी उर्जा देईल, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …