no images were found
मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा हे ठरले अॅमेझॉनच्या प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते
कोल्हापूर , : अॅमेझॉन इंडियाने आज अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग प्रोपेल स्टार्टअप अॅक्सीलरेटर (प्रोपेल अॅक्सीलरेटर) सीझन ३ चे विजेते म्हणून मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांच्या नावाची घोषणा केली. विजेत्यांना अॅमेझॉन कडून एकत्रितपणे अनुदानात ८३ लाख रुपये मिळाले. मिराना टॉईज अॅप नियंत्रित ऑगमेंटेड रिअॅलिटी गेम्स द्वारे डिजिटल आणि फिजिकल खेळाचे मिश्रण केले असून नाविन्यपूर्ण स्मार्ट खेळण्यांची श्रेणी ते सादर करतात. एव्हीमी हर्बलची स्थापना ८५ वर्षीय राधा कृष्ण चौधरी उर्फ नानाजी यांनी केली. आपल्या रोजच्या दिवसाच्या केसांविषयक समस्यांसाठी प्रभावी, शतकापासून चालत आलेल्या आयुर्वेदावर आधारित केसांची निगा ठेवणारा हा ब्रॅंड आहे. पर्फोराचे उद्दिष्ट स्वच्छ घटक आणि चांगल्या डिझाईनसह दररोजची मौखिक निगा उंचावणे हे आहे. हा भारताचा पहिला प्रमाणित ओरल हेल्थ ब्रॅंड असून “ १टक्के फॉर द प्लॅनेट” कम्युनिटीचा सदस्य आहे.
प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ व्हेंचर कॅपिटल फर्म अॅक्सेल, अॅमेझॉन संभव व्हेंचर फंड, डीएसजी कंन्झ्यूमर पार्टनर्स, फायरसाइड व्हेंचर्स, पीक एक्सवी , वी३ व्हेंचर्स तसेच क्लब आणि व्हेलॉसिटी सह महसूल आधारित वित्तीय फर्म यांसह मार्च २०२३ मध्ये सादर झाले. तिसऱ्या सीझनला भारतातील १४० शहरांमधून स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख ब्रँड्सद्वारे १२०० हून अधिक अर्जासह जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जिवा , मोकाबरा , ओपन सिक्रेट आणि इतर ब्रँड्ससह ४७ स्टार्टअप्सची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विजेत्यांना आणि सर्व अंतिम स्पर्धकांना एडब्ल्यूएस सक्रिय क्रेडिट्समध्ये एक दशलक्ष (संचयी) डॉलर देखील मिळाले.
कार्यक्रमात ८ आठवड्याचा अॅक्सीलरेटर समाविष्ट होता ज्याचा भाग म्हणून भारतातील अॅमेझॉन लिडर्स, विसी भागीदार आणि इतर विशिष्ट उद्दिष्ट धारित कार्यशाळेद्वारे अंतिम स्पर्धकांसोबत सहभागी झाले. जागतिक मागणीच्या पद्धतींवर १:१ मार्गदर्शन केले आणि ई-कॉमर्स द्वारे यशस्वी निर्यात व्यवसाय तयार करण्यासाठीची माहिती दिली. शेवटी, बहुविद्याशाखीय पॅनेलद्वारे निवडलेल्या १० अंतिम स्पर्धकांना फायरसाइड व्हेंचर्स कडून प्रयाग मोहंती, पीक एक्सव्ही कडून श्रेयांश ठाकूर, अॅमेझॉन संभव व्हेंचर फंड कडून प्रीतम एन, डीएसजी कंन्झ्यूमर पार्टनर्स कडून पूजा शिराली आणि वि३ व्हेंचर्सकडून अभिराम भालेराव या प्रतिष्ठित ज्युरीसमोर सादरीकरणाची संधी मिळाली. परीक्षकांनी व्यवसायाची कल्पना आणि गाभा, प्रोडक्ट मार्केट फिट, पिच बाजारपेठेतील बिझनेस मेट्रिक्स आणि जागतिक विस्तार योजना यासह विविध मापदंडावरून मूल्यांकन केले. परीक्षकांनी मिराना टॉईज, एव्हीमी हर्बल, पर्फोरा यांना प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते म्हणून घोषित केले.
ॲमेझॉन इंडियाच्या ग्लोबल ट्रेडचे संचालक भूपेन वाकणकर म्हणाले, “प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ च्या सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो. देशाच्या विविध भागांमधील स्टार्टअप्समधून अशी उद्योजकता, नाविन्यपूर्णता आणि जागतिक ब्रँड तयार करण्याची महत्त्वाकांक्षा पाहणे आनंददायक आहे. भारतीय लघु व्यवसाय आणि डी२सी ब्रँड्समध्ये ईकॉमर्स निर्यातीचा जलद अंगिकार होत असल्याची ही पावती आहे. भारतातून जागतिक ब्रँड तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांकरिता स्प्रिंगबोर्ड तयार करण्यास पाठबळ देणाऱ्या आमच्या सर्व भागीदारांचेही मी आभार मानू इच्छितो. सर्व आकारांतील व्यवसायांसह आम्ही काम करणे सुरूच ठेवत त्यांना त्यांची उत्पादने जगभरातील ग्राहकांपर्यंत नेण्यात मदत करू आणि २०२५ पर्यंत भारतातून एकत्रित ईकॉमर्स निर्यात २०बी डॉलर एवढी सक्षम करू.”
प्रोपेल अॅक्सीलरेटर सीझन ३ चे विजेते मिराना टॉईजचे सहसंस्थापक देवांश शर्मा म्हणाले, “जगभरातील मुलांना नाविन्यपूर्ण खेळणी मिळवून देण्यासाठी तशा प्रकारे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सुरुवातीपासूनच वापरुन जागतिक पातळीवरील टॉय ब्रॅंड बनण्याच्या उद्देशाने मिराना टॉईजची स्थापना झाली. भारतात आमचा हा दृष्टिकोन पूर्णत्वाला नेण्यासाठी अॅमेझॉन मार्केटप्लेस हा सर्वाधिक महत्वाचा भागीदार आहे. प्रोपेल प्रोग्रॅमने जागतिक बाजारपेठेचा मागोवा घेण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आमची उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यासाठीची ही सर्वोत्तम संधी आम्हाला मिळाली.
अॅमेझॉन प्रोपेलने जागतिक पातळीवर विक्री करण्याच्या प्रत्येक पैलूत आम्हाला मदत केली. गेल्या काही महिन्यांत, आम्हाला इंडस्ट्री लीडर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि पिअर्स यांच्याशी संवाद साधण्याच्या असंख्य संधी मिळाल्या. त्यातून जागतिक पातळीवर व्यवसाय प्रस्थापित करण्यामधील गुंतागुंत, विविध जागतिक ग्राहकांच्या प्राधान्यांची पूर्तता करणे अशा अनेक गोष्टींबद्दल अत्यंत मौल्यवान माहिती मिळाली. हे पाठबळ आणि मार्गदर्शन वापरुन आम्ही गेल्या ६ महिन्यात अॅमेझॉन यूएसए वर पथदर्शी विक्री केली आणि त्यात यशस्वी वाढ झाली. आगामी वर्षांमध्ये बहुविध नवीन जागतिक बाजारपेठेत आमचा व्यवसाय विस्तारण्याबाबत आम्हाला विश्वास आहे.”