
no images were found
संगीतकार ए. आर. रहमान यांचे सहकारी गायक बाम्बा बाक्या काळाच्या पडद्याआड
ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांचे सहकारी गायक बाम्बा बाक्या यांचे निधन झाले आहे. भारतीय संगीत विश्वाला हा मोठा धका आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाक्या काही दिवसांपासून हदयविकारानं त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या जाण्यानं रहमान यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मणिरत्नम यांच्या आगामी पोनियन सेल्वन या चित्रपटातील महत्वाचे गायक म्हणून बाक्या यांच्याकडे पाहिले जात होते. तमिळ चित्रपट विश्वातील प्रसिद्ध गायक म्हणून बाक्या यांची ओळख होती. रहमान यांनी देखील आपला जवळचा सहकारी गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. बाक्या यांना रहमाननं रजनीकांत यांच्या 2.0 चित्रपटात लाँच केले होते. सध्या बाक्या यांनी मणिरत्नम यांच्या आगामी पोन्नियन सेल्वन गाण्यानं देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. बाक्या यांना काल हदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर तातडीनं चेन्नई़तील एका रुग्णालय़ात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.