Home मनोरंजन सोनी सबवरील ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मधील गुरू-शिष्‍य नाते

सोनी सबवरील ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मधील गुरू-शिष्‍य नाते

1 min read
0
0
76

no images were found

सोनी सबवरील ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मधील गुरू-शिष्‍य नाते

गुरू-शिष्‍याचे नाते पवित्र मानले जाते आणि त्‍या नात्‍यामध्‍ये मैत्री झाली तर ते अधिकच बहरते. या नात्‍याचे सर्वोत्तम उदाहरण म्‍हणजे पुष्‍पा (करूणा पांडे) व तिचे शिक्षक आशुतोष नानावटी (जगत रावत) यांच्‍यामध्‍ये असलेले नाते. आशुतोषने पुष्‍पाच्‍या शैक्षणिक प्रवासामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावली, तो तिच्‍या यशामधील आधारस्‍तंभ बनला. त्‍यांच्‍यामधील नाते गुरू-शिष्‍यापलीकडील आहे, ते चांगले मित्र देखील आहेत. पुष्‍पा अडथळ्यांचा सामना करत असताना त्‍यावरील उपायांसाठी आशुतोषकडे पाहते. तो पुष्‍पाचा शिक्षक आहे आणि पुष्‍पाची अद्वितीय मानसिकता आशुतोषला त्‍यांच्‍या संवादांमधून नवीन काहीतरी शिकवण देते. पण पडद्यामागे देखील त्‍यांच्‍यामध्‍ये उत्तम मैत्री आहे.

जगत रावतसोबतच्‍या साहचर्याबाबत सांगताना करूणा पांडे म्‍हणाली, ‘’आशुतोष नानावटी हा पुष्‍पाचा तिच्‍या शैक्षणिक प्रवासामधील मोठा समर्थक आहे आणि ती नेहमी अडचणींवरील उपायांसाठी त्‍याचा आधार घेते. ती तिच्‍या शिक्षणामधील कोणत्‍याही समस्‍येच्‍या उपायासाठी त्‍याच्‍यावर अवलंबून राहू शकते आणि पुष्‍पाला त्‍याची हुशारी व सहानुभूतीचा फायदा होतो. मी नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामामधील माझ्या रंगभूमी दिवसांपासून जगतजींना ओळखते आणि मी त्‍यांचा खूप आदर करते. माझ्या मते, आमच्‍यामध्‍ये वास्‍तविक जीवनात एकमेकांप्रती असलेला आदर पडद्यावर दिसून येतो.’’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …