
no images were found
श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे पुण्यात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन
कोल्हापूर – श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीटीपीएल) ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडची मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) आहे. कंपनीने अलीकडेच पुण्यात नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. श्याम ग्लोबल टेक्नो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्लांट आणि मुख्यालय पुणे येथे आणि ब्रँच ऑफिस मुंबई येथे आहे. एसजीटीपीएलने जागतिक दर्जाच्या जेन सेट्सचे उत्पादन करणारा अत्याधुनिक प्लांट तयार केला आहे. जेथे उच्च उत्पादकतेसाठी उत्तम इंधन व्यवस्था, एक्झॉस्ट एमिशन्स आवश्यक असते, एसजीटीपीएलकडे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि स्पेक्ट्रम उद्योगातील मोठ्या गरजा पूर्ण करणारे जेन सेट आहेत. ही कंपनी दीर्घकाळ चालणारे आणि कमी देखभालीसह उच्च दर्जाचे, लो मेंटेनन्स जनरेटर तयार करते. महिंद्रा पॉवरॉलचा वापर बांधकाम क्षेत्रात, हॉस्पिटल, इंडस्ट्री, स्कूल, पेट्रोल पंप, टेलिकॉम, क्रशिंग उद्योगात केला जातो. या नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन हेमंत सिक्का (अध्यक्ष, एफईएस, पॉवरॉल बिझनेस महिंद्रा अँड महिंद्रा) यांनी केले. संजय जैन (बिझनेस हेड, पॉवरोल), नरेंद्र गोयल (संचालक, श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि महिंद्राचे इतर प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते. श्याम ग्लोबल सध्या पुण्यातील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेमध्ये ५ केवीए ते ६२५ केवीएपर्यंतचे जेनसेट तयार करत आहे, एसजीटीपीएलचा पुण्याबाहेर तीन एकरहून मोठा कारखाना आहे, ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त व्यवस्थापक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एसजीटीपीएल ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची अधिकृत मूळ उपकरण उत्पादक कंपनी आहे. या प्रख्यात भारतीय ब्रँडने, महामारीच्या काळात काळाची गरज ओळखून आणि आपले सामाजिक कर्तव्य म्हणून कोविड रुग्णालयांसाठी ऑक्सिजन जनरेटर मॅन्युफक्चरिंगद्वारे पॉवर बॅकअप प्रदान केला.