
no images were found
जागतिक स्पर्धेत भारताला प्रथमच पुरुष दुहेरीचे पदक मिळणार
महाराष्ट्राच्या युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने शुक्रवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्याने आपला सहकारी सात्त्विकराजसोबत भारतीय संघासाठी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या इतिहासात पहिले दुहेरीचे पदक निश्चित केले. भारताच्या या राष्ट्रकुल चॅम्पियन जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सनसनाटी विजयाची नोंद केली. त्यांनी १ तास १५ मिनिटांत गत चॅम्पियन ताकुरो होकी आणि युगो कोबायाशीला धूळ चारली. सातव्या मानांकित चिराग-सात्त्विकराजने २४-२२, १५-२१, २१-१४ ने रोमहर्षक विजयाची नोंद केली.