no images were found
जपानी भाषेच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत १४ विद्यार्थ्यांचे यश
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या १४ विद्यार्थ्यांनी ‘जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा’ (जे.एल.पी.टी.) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.
जपान फाऊंडेशन व जपान एज्युकेशनल एक्सचेंजेस अँड सर्व्हिसेस या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जगभरात एकाच दिवशी एकूण ‘५ लेवल’ मध्ये जपानी भाषा प्राविण्य चाचणी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र हे जपानी कंपनीमध्ये नोकरीच्या संधीसाठी खूप उपयुक्त ठरते. यापूर्वी विभागातील पूर्वा नाडगोडा व प्रमोद कदम यांनी या परीक्षा उत्तीर्ण होऊन जपानमध्ये नोकरीची संधी मिळवली आहे व ते सध्या जपानमध्ये कार्यरत आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेवल ‘एन-५’ मध्ये समीप जोतकर, देविका राणे, तन्वी डांगे, प्रीती मोगाने, अनुराग सामंत, समृद्धी मंडलिक, अमृता राणे, कीर्ती गायकवाड, प्राजक्ता आगलावे, देवराज पवार, आकांक्षा पाटील, सृष्टी तांदळे, अनिकेत निर्माले यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच ‘एन-४’ या लेवल मध्ये कु.ऋतिका वायकोळे हिने यश मिळवले आहे. जपानी भाषा शिक्षिका श्रीमती स्नेहल शेट्ये यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केले. डॉ. मेघा पानसरे यांनी विभागातील विद्यार्थ्यांच्या यशामुळे विदेशी भाषा विभागप्रमुख म्हणून अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त केले.