no images were found
कौशल्य व उद्योजकता विकासात कौशल्य समन्वयकाची भूमिका महत्त्वाची – प्रा. डॉ. आर. जी. पवार
वेगाने बदलणाऱ्या जगात कौशल्य व उद्योजकता यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होईल. त्यासाठी महाविद्यालयाची व कौशल्य समन्वयकाची भूमिका महत्त्वाची ठरेल असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठाच्या एकदिवशीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बिझनेस कोच श्री. रवींद्र खैरे, शिखर बँकेचे गणेश गोडसे व विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. जी. पवार उपस्थित होते.
विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयातील समन्वयकासाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्योजकता विकास, कौशल्य विकास, नवोपक्रम, स्टार्ट अप, बँकेच्या विविध योजना, उद्योगासाठी शासनाच्या योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी प्रा. पी. डी. राऊत, रवींद्र खैरे, गणेश गोडसे, श्री. राहुल गोरे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दिवसभर विविध विषयांवर मंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. जी. पवार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कौशल्य विकास अधिकारी श्री. प्रमोद कांबळे यांनी केले. यावेळी सांगली, सातारा,
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील कौशल्य समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.