no images were found
अभिनेते अतुल परचुरे साकारणार ‘साहुकार‘ची भूमिका
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील यशोमती मैया के नंदलाला या पौराणिक मालिकेत यशोदाच्या (नेहा सरगम) दृष्टिकोनातून आई आणि मुलामधील सुंदर नात्याची गुंफण चितारण्यात आली आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकीकडे ‘कृष्ण जन्मोत्सव’, तर दुसरीकडे मालिकेचा 3 वर्षांच्या स्थित्यंतरात प्रवेश होणार आहे. बाहेरच्या जगाबद्दल कान्हा किती जिज्ञासू आहे आणि दुसरीकडे, यशोदा माता त्याची काळजी आणि संरक्षण करण्याचा कसा प्रयत्न करतेय, हे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मालिकेत आता लाेकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांची एंट्री होणार असून ते ‘साहुकार’ची भूमिका साकारताना दिसणार आहेत.स्वभावाने अतिशय लोभी असलेला हा साहुकार गोकुळवासीयांची लुबाडणूक आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो. भगवान कृष्ण अतिशय चौकसबुद्धीच्या बालकाच्या रूपात पहिल्यांदाच मैया यशोदा आणि नंद यांच्यासोबत बाजारपेठेत पाऊल टाकताना दिसणार आहेत. या वेळी मैया यशोदा तिच्या कान्हाला जीवनमूल्ये आणि चांगल्या-वाईटातील फरकाबाबत िशकवण देताना दिसणार आहे. लोभापायी लोकांच्या आयुष्यात होणारे नुकसानही त्या अधोरेखित करून सांगताना दिसणार आहेत.
मालिकेत साहुकारची भूमिका निभावणारे अतुल परचुरे यांनी पौराणिक मालिकेत सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला.