Home मनोरंजन शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आला समोर

शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आला समोर

0 second read
0
0
227

no images were found

शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आला समोर

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेचे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक एक्शन – रोमँटिक सिनेमा आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या आत्तापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असं म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक आत्तापर्यंत कोणी पाहिला नसेल असा आहे.

मराठी -हिंदी मालिका , मराठी सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर शिवानीचा हा लूक हा थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा, आत्तपर्यंत शिवानीला सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता हा तिचा ग्लॅमरस नसलेला लूक आहे, त्यामुळे तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या लूक बद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे. दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…