Home मनोरंजन ‘विक्रम वेधा’च्या टीझरला सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर २५ + मिलियन व्ह्यूज

‘विक्रम वेधा’च्या टीझरला सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर २५ + मिलियन व्ह्यूज

2 second read
0
0
222

no images were found

विक्रम वेधाच्या टीझरला सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर २५ + मिलियन व्ह्यूज

अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला ‘विक्रम वेधा’चा टीझर लाँच झाल्यानंतर तो दिवसभर ट्विटर आणि यूट्यूबवर ट्रेंड करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘विक्रम वेधा’च्या टीझरचे प्रेक्षकांबरोबरच चित्रपटक्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केले. यामध्ये विकी कौशल, अभिषेक बच्चन, करीना कपूर-खान, राकेश रोशन, सारा अली खान, आलिया भट्ट, झोया अख्तर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, कतरिना कैफ, क्रिती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चोप्रा, सुनिधी चौहान, तोरंज कायवॉन, नंदिश संधू, पुनित डी मल्होत्रा ​​आणि इतर सेलिब्रिटींचा समावेश आहे.

हृतिक रोशनने साकारलेल्या वेधच्या बदमाश अवतारापासून ते सैफ अली खानच्या विक्रम या पोलिसाच्या भूमिकेपर्यंत, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आकर्षक आणि मनोरंजक असल्याचे या टीझरमधून दिसून आले.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…