
no images were found
गीतांजली मिश्राने घेतला बोट राइडचा आनंद
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये नवीन राजेश सिंगच्या भूमिकेत प्रवेश केलेल्या गीतांजली मिश्राने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. यादरम्यान अभिनेत्री शहरांना भेट देण्यामध्ये आणि चाहत्यांसोबत गप्पागोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे. नुकतेच अभिनेत्रीने सिटी ऑफ लेक्स – भोपाळला भेट दिली, जेथे तिने चाहत्यांची भेट घेतली, खरेदी केली, पाककलांचा आस्वाद घेतला आणि बोट राइडचा आनंद घेतला. पाण्याची भिती वाटत असताना देखील अभिनेत्रीने भोपाळमध्ये बोट राइडच्या रोमांचचा आनंद घेतला. अभिनेत्री तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहून भारावून गेली.
बोटिंगचा आनंद घेण्याचा अनुभव आणि पाण्याच्या भितीवर मात करण्याबाबत मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ रज्जो म्हणाल्या, ”प्रामाणिकपणे सांगायचे तर अप्पर लेकच्या पाण्याची पातळी पाहून माझ्या हृदयात धडकी भरली आणि मी बोटिंगला जाऊ की नको या विचारात पडले. मी स्वत:लाच प्रश्न विचारला: मी हे करू शकते काॽ मला पोहायला येत नसल्यामुळे नदी, तलावांमध्ये जायला खूप भिती वाटायची. असे असले तरी प्राचीन कृत्रिम तलावांच्या मोहकतेने माझे लक्ष वेधून घेतले आणि मला बोटिंग करण्यास भाग पाडले. लाइफजॅकेट घालून मी बोटवर गेले आणि बोट सुरू होताच माझे पाय थरथरू लागले. पण बोट पुढे जाऊ लागताच माझा उत्साह देखील वाढला आणि वर्दळीच्या शहरामधून नयनरम्य सौंदर्यामध्ये भारावून गेले. बोटीवर होणाऱ्या पाण्याच्या शिडकाव्यामधून सुखद आनंद मिळाला आणि ते दृश्य थक्क करणारे होते. बोटीच्या अवतीभोवती उडणारे पक्षी आणि पाण्यामध्ये लहान मासे पाहायला मिळाले आणि वातावरण खूपच नयनरम्य होते. मी बोटिंगमधून निसर्गाच्या खऱ्या सौंदर्याचा आनंद घेतला. बोटिंगमधून मला निसर्गाशी जुडण्याची, उत्साहवर्धक वातावरणाचा अनुभव घेण्याची आणि तलावामधील पाण्याच्या मंजूळ आवाजाचा आनंद घेण्याची संधी मिळाली, जे खूपच उत्साहवर्धक होते. या सर्व गोष्टींमधून शांतता व निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव मिळाला.