
no images were found
आशिया चषक लढत आजपासून
आशिया चषक 2022 शनिवारपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ यांचेत होईल.
श्रीलंकेचे कर्णधार दासुन शनाका तर अफगाणिस्तानचे नेतृत्व मोहम्मद नबी करणार आहे. 2016 च्या T-20 विश्वचषकादरम्यान श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंतचा एकमेव T-20 सामना खेळला गेला होता ज्यामध्ये श्रीलंकेने विजय मिळवला होता. अफगाणिस्तान संघाने स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी गेले काही वर्षे अतोनात कष्ट घेतलेले आहेत.
या स्पर्धेत 15 दिवसांत 13 सामने खेळवले जाणार असून पहिल्या दोन गटातील संघ प्रत्येकी दोन सामने खेळतील आणि तळातील संघ बाद होईल. यानंतर सुपर फोरचे सामने सुरू होतील आणि येथे सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. ब गटातील पहिला सामना शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. अफगाणिस्तानने गेल्या पाच टी-20 पैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, श्रीलंकेला गेल्या पाचपैकी चार पराभव स्वीक्स्रावे लागले आहेत. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेटवर श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आशिया चषक 2022 च्या पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.