
no images were found
सोलापुरातील प्रसिद्ध गणपतीच्या डोळ्यातून येतात अश्रू?
सोलापूर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. सोलापुरातील कुंभारी भागातील हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी पसरताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली तर अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
सोलापुरातील कुंभारी येथे गणपती मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहात असल्याची बातमी गावभर पसरली, गणपतीच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील एका गणपती मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याने गणपती अश्रू ढाळत असल्याची बातमी सर्वत्र पसरली. यामुळे भाविकांनी येथील मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली. गणपतीच्या डोळ्यातून अश्रू आल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. तर अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
कुंभारी रस्त्यावरील स्वामीनारायण गुरुकुलच्या जवळच असलेल्या ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी पसरताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी हार, श्रीफळ अर्पण केलं. दरम्यान,अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून ही अफवा असून यामागचे शास्त्रीय कारण काय याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल,असे सांगण्यात आले आहे.