no images were found
राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार बरसणार
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडीप असणार आहे. दरम्यान पुढच्या 24 तासांत हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. तसेच मुख्यतः पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज आहे.
दरम्यन मागच्या 24 तासांत, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे जोरदार पाऊस झाला. कोकणातील दापोली 80, लांजा, खेड 60, वाकवली, हर्णे, चिपळूण, पोलादपूर प्रत्येकी 50, सावंतवाडी, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी 40, मंडणगड, संगमेश्वर, देवरूख, राजापूर, माथेरान, महाड, तळा प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.महाबळेश्वर 100, गगनबावडा 70, शाहूवाडी 50, इगतपुरी, लोणावळा प्रत्येकी 40, राधानगरी 30, दावडी 100, ताम्हिणी, शिरगाव प्रत्येकी 90, अंबोणे 80, डुंगरवाडी 70, कोयना नवजा, कोयना पोफळी प्रत्येकी 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. तसेच मुख्यतः पावसाने बहुतांश ठिकाणी उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 24) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज आहे.
कोकणातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, वाडा या भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर रायगड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पोलादपूर परिसरात सर्वाधिक 46 मिलिमीटर पाऊस झाला. तर महाड, माथेरान, श्रीवर्धन आणि तळा या भागातही हलक्या पावसाने हजेरी लावली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 82 मिलिमीचर तर लांजा येथे 60 मिलिमीटर पाऊस झाला. हरनाई, चिपळून, खेड, वाकवली या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही भागात जोरदार पाऊस झाला.