no images were found
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर निवडी जाहीर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष पदी सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची तर महिला सहचिटणीस पदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता पूनम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सह चिटणीस म्हणून राज्यकर उपायुक्त चंद्रकांत मंचरे व उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या गोरेगाव, मुंबई येथे 20 व 21 ऑगस्ट रोजी झालेल्या अधिवेशनात त्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. याच यादरम्यान महासंघाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची सन 2022 ते 2025 अशी त्रैवार्षिक निवड यादी निवडणूक अधिकारी आर.जे.पाटील यांनी घोषित केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिवेशनात महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे म्हणाले, राजपत्रित अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामाला प्राधान्य देवून उर्वरित वेळेत राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महासंघालाही वेळ द्यावा. आजवर महासंघाचे काम करताना सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली. महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये तरुण पिढीतील सदस्यांची संख्या अधिक असून यापुढेही महासंघाचे काम आणखी जोमाने होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.
अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तत्कालीन सरचिटणीस विनायक लहाडे, कोषाध्यक्ष समीर भाटकर, नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.