no images were found
बजाजची कडक बाईक ‘CT125X’ दाखल
पुणे : जगातील दुचाकी आणि तिचाकीच्या क्षेत्रातील सर्वात मूल्यवान कंपनी ‘बजाज ऑटो’ने ‘CT125X’ बाईक दाखल करत असल्याचे जाहीर केले आहे. हे नवीन उत्पादन ‘हर सडक पर कडक’ या तत्त्वाला अनुसरून साकारले गेले असून ही दुचाकी दरदिवशीची लांब पल्ल्याची सवारी आणि आव्हानात्मक चलन अनुभवाच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे.
बजाज ऑटोच्या ‘CT125X’मध्ये अनेक वैशिष्ट्ये असून ही बाईक टिकाऊ आहे. ज्या बाईकस्वारांना संपूर्ण दिवस ती चालवायची असते आणि काहीवेळा फूड डिलिव्हरी, कुरियरसेवा किंवा व्यापार वितरणासारख्या व्यवसायात त्यावरून सामान न्यायचे असते त्यांच्यासाठी ही आदर्शवत बाईक आहे. या दुचाकीस्वारांना काहीवेळा आव्हानात्मक वातावरणात आणि वाईट रस्त्यांवर दुचाकी चालवावी लागते. अशावेळी त्यांना भोरोसेदायी आणि दणकट गाडी लागते. ही गाडी अद्वितीय अशी कामगिरी देते, ती दणकट पद्धतीने बनली आहे आणि दिसायला शैलीदार आहे.
बजाज ऑटोच्या मोटरसायकल विभागाचे अध्यक्ष श्री सारंग कानडे यावेळी बोलताना म्हणाले, “CT125X दाखल करून आम्ही एक वेगळे उत्पादन ग्राहकांना देत आहोत. ही बाईक उत्तम कामगिरी आणि अतुलनीय टिकाऊपणासह उत्तम मुल्य मिळवून देते. नवीन ‘CT125X’ची किंमत अत्यंत किफायतशीर असून ती रस्त्यांवर आव्हानात्मक परिस्थितीसाठी आणि लांबपल्ल्याच्या सफारीसाठी सुयोग्य अशीच आहे. ती डिस्क आणि ड्रम या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.”