
no images were found
जागतिक महिला दिन: मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमांतर्गत कोरोचीत रोजगार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर कार्यालयामार्फत शुक्रवार दि. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये खासगी क्षेत्रातील 13 कंपन्या सहभागी झाल्या असून 720 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या पदांसाठी किमान 10 वी , 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी आय. टी. आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र आहेत. या मेळाव्यात कळविण्यात आलेली पदे सी.एन.सी.,व्ही.एम.सी. ऑपरेटर, जॉब इन्स्पेक्टर, ट्रेनी,टेलर्स, मशीन ऑपरेटर, हेल्पर, मेकॅनिक, अकाऊंटंट, प्लोअर सुपरवायझर, सेल्स एक्झिक्युटीव्ह, एचआर असिस्टंट, स्टोर असिस्टंट इ. आहेत.
इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार आणि उद्योजकांनी 0231-2545677 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र. सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.