no images were found
नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम उत्साहात साजरा
कोल्हापूर : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र, कोल्हापूर मार्फत शिवाजी विद्यापीठात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी. टी. शिर्के तर प्रमुख अतिथी आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये दिवसभरात चार सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये My Bharat Portal, तृणधान्याचे जीवनातील महत्व, Vocal for Local, युवा संसद या विषयावर करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून युवक -युवती सहभागी झाले होते. तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. पी एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले, यीनचे अवधूत गायकवाड डॉ. प्रमोद कसबे, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, कार्यक्रम पर्यवेक्षक भानुदास यादव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भोसले यांनी केले.