Home सामाजिक प्रमुख शहरांबरोबर हल्दीराम उत्पादने कोल्हापूरमध्ये

प्रमुख शहरांबरोबर हल्दीराम उत्पादने कोल्हापूरमध्ये

0 second read
0
0
64

no images were found

हल्दीरामच्या विविध उत्पादनाची चव आता कोल्हापूरमध्ये चाखायला मिळणार

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हल्दीराम यांच्या स्वीट पदार्थाना ग्राहकांचा कोल्हापूर मध्ये चांगला प्रतिसाद मिळणार आहे. असे उदगार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी काढले. कोल्हापूरमध्ये पुणे – बेंगलोर हायवेवर हल्दीराम यांच्या नवीन स्वीट मिठाई शॉपीचे उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ संचालक नीरज अग्रवाल,राजवर्धन निगडे,यशराज निगडे,जयेश कदम,राजीव लिंग्रस यांच्यासह विविध मान्यवर यांची उपस्थिती होती. १९३७ साली सुरू झालेल्या हल्दीराम या छोट्याश्या दुकानाचा विस्तार जगभरात झाला असून कोल्हापूर मध्येही आता हल्दीरामने पाऊल टाकले आहे. ग्राहकांच्या आवडीच्या बंगाली, गुजराथी यासह विविध ठिकाणच्या जवळजवळ ५०० हुन अधिक स्वीट पदार्थ व मिठाई, ज्यात बंगाली मिठाई, छोले बटोले हल्दीरामने उपलब्ध करून दिल्या आहेत. कोल्हापूरच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

यावेळी बोलताना नीरज अग्रवाल म्हणाले कि, गणेशोत्सव,  दसरा आणि दिपावली या सणांच्या कालावधीत माफक दरात पदार्थ ग्राहकांना देणार आहोत. या शहरात, अधिक चव वाढवण्यासाठी हल्दीरामचे पहिले आउटलेट आले आहे. कोल्हापुरातील लोकांना चविष्ट, पौष्टिक शाकाहारी पदार्थ चाखायला मिळतील असा विश्वास यावेळी हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे ​ संचालक नीरज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब असो, मित्र असोत किंवा कार्यालयातील सहकारी असोत, नवीन हल्दीरामच्या आउटलेटमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर ही असणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…