Home स्पोर्ट्स पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

0 second read
0
0
339

no images were found

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापुर या करवीर नगरीतील ऐतिहासिक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी देश विदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन” ही स्पर्धा येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे. या स्पर्धेची स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून दिल्ली, लातूर, सोलापूर, हुबळी,धारवाड ,बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे. एकूण १५०० स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे.अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक, उदय पाटील, आयर्नमॅन वैभव बेळगावकर, राजीव लिंग्रस, समीर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राख असा संदेश  मॅरेथॉन मधून दिला जाणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन हे रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मालोजीराजे छत्रपती,जिल्हाधिकारी राहुल रेखावर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेजचे संजय. डी. पाटील, पोलीस अधीक्षक. श्री शैलेश बलकवडे, आम.विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे.शिवाय या मॅरेथॉनमध्ये २५ शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची असून यातील २१ किलोमीटर स्पर्धा ही सकाळी ६ वाजता तबक उद्यान पन्हाळा येथून सूरु होणार आहे. ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला,पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान येथे समाप्त अशी होणार आहे. तर ११ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन ही तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा,लता मंगेशकर बंगला, पावनगड,बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान समाप्त होणार आहे.आणि ५ तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा नरवीर शिवा काशीद पुतळा,पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज,जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान अशी होणार आहे.

मॅरेथॉनचे वयोगट या हाफ मॅरेथॉन मधील ५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१किलोमीटरची मॅरेथॉन ही  १८  वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.

सहभागी सर्व स्पर्धकांना मिळणार किट दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी शांतीनिकेतन स्कुल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत स्पर्घेमघ्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना किट दिले जाणार आहे.जवळजवळ दोन हजार स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या मॅरेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना गुडी बॅग, टी. शर्ट, फीनीशर मेडल, टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी) ई – सर्टिफिकेट नाश्ता  आदी दिले जाणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत. डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे,मधुकर बिरंजे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वरील सर्वजन स्पर्धेचे संयोजन करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…