
no images were found
नगररचना विभागात स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती
कोल्हापूर : गुंठेवारी विकासाचे नियमीतीकरण, श्रेणीवाढ करण्यासाठी आणि गुंठेवारी विकासाचे नियंत्रण करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित अधिका-यांनी दैनंदिन कामकाज पाहून गुंठेवारी नियमितीकरण मागणी अजांचे संकलन करणे, अर्जांची तपासणी करण्यासाठी या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्याकडे गुंठेवारी नियमितीकरणासाठी दाखल होणाऱ्या अर्जाची कागदपत्रांची तपासणी करणे. तपासणी नंतर प्रस्ताव सादर करणे. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार गुंठेवारी संबंधाने कामकाज पाहणे. कनिष्ठ अभियंता श्रध्दा बेडेकर यांनी दाखल झालेल्या अर्जाचे संकलन करणे, अर्ज स्विकारणे त्याची पोहोच देणे, रजिस्टर मध्ये अद्यावत नोंदी ठेवणे. आरेखक खुशालचंदे राजमाने व कनिष्ठ लिपीक अक्षय गोदमुले यांनी गुंठेवारी संबंधाने दाखल झालेल्या फाईल्स रजिस्टर मध्ये नमुद करुन रेकॉर्ड मध्ये स्वतंत्र ठेवणे. पहारेकरी तथा संगणक सचिन पन्हाळकर यांनी गुंठेवारी संबंधाने दाखल होणाऱ्या अर्जाचे संगणकीय चलन काढणे. त्याचे आदेश तयार करणे व इतर अनुषंगीक सर्व संगणकीय कामकाज करणेबाबत नियोजन करुन देण्यात आले आहे.