no images were found
‘स्फियरओरिजीन्स मल्टीव्हिजन’चा ‘बालभारती’ हा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित
मुंबई : बालिका वधू, पेशवा बाजीराव, पंड्या स्टोर, सरस्वती चंद्र आणि यांसारख्या अनेक गाजलेल्या, विक्रम प्रस्थापित केलेल्या आणि पुरस्कार विजेत्या मालिकांचे निर्माते आता मराठी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘बालभारती’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट चंदेरी पडद्यावर लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे कारण त्याची आगळी-वेगळी कथा, हलकी फुलकी मनोरंजक मांडणी आणि त्यात भूमिका असलेले आजचे लोकप्रिय कलाकार. या चित्रपटाची निर्मिती ‘स्फियरओरिजीन्स मल्टीव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड’ची असून या कंपनीचे संस्थापक संजोय आणि कोमल वाधवा हे आहेत.
बालभारती चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याचा मुद्द्यांना एकत्र जोडतो. गमतीदार हलक्याफुलकी कथा बघताना आपलेपणाची भावना तयार होते म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी हृदयांला चित्रपट भावणार आणि बालभारतीशी प्रेक्षकांची नाळ लगेच जुळेल असा विश्वास सर्वांना आहे.