no images were found
निवडणूक काळातील मोफत सुविधांचे प्रकरण 3 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग
दिल्ली : सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक काळातील मोफत योजनांचे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने राज्याला मोफत सुविधांवर लगाम घालण्याचे आवाहान केल्यानंतर दक्षिणेतील काही पक्षांकडून आणि दिल्लीतील आपकडून या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेले होते.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून आता हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे असे, की फ्रीबीज प्रकरणाची गुंतागुंत पाहता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले जाते. सुप्रीम कर्टाने आपल्या निकालात सांगितलं की, मोफत वाटप सुरू राहिलं तर भविष्यात देश आर्थिक आपत्तीकडे जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले जात आहे. या प्रकरणाची सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमू्र्ती हिमा कोहली यांच्या अध्यतेखाली सुनावणी पार पडली.