no images were found
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं प्रथमच लाईव्ह स्ट्रीमिंग
भारताचे मुख्य सरन्यायाधीश एन. व्ही. आज म्हणजेच, 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अशातच CJI NV रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2018च्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह स्ट्रिमिंग केले जात आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आज 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची नेमणूक 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून करण्यात आली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच, 24 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. निवृत्त होत असताना त्यांनी न्यायाधिशांच्या नियुक्त्यांबाबतचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. न्यायपालिकेत आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणूक करणाऱ्या सरन्यायाधिशांच्या यादीत रमण्णा पहिल्या क्रमांकावर आले आहेत. रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती उदय लळीत 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारतील.
एन. व्ही. रमण्णा त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाच्या पुढील सरन्यायाधीशांसोबत बेंच शेअर करतील. रमण्णा यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी औपचारिक खंडपीठासमोर त्यांचा निरोप समारंभ पार पडेल. आज CJI रमण्णा CJI नियुक्त न्यायमूर्ती UU ललित यांच्यासोबत बेंच शेअर करतील.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आज सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची किंवा औपचारिक खंडपीठाची कार्यवाही नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर वेबकास्ट पोर्टलद्वारे थेट प्रक्षेपित केली जाईल.