
no images were found
सोलापुर पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल
सोलापूर महानगरपालिकेत पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरात खाजगी टँकरद्वारे पुरवठा करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत पाणी टँकर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरात खाजगी टँकरद्वारे पुरवठा करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत टँकरच्या ज्यादा खेपा दाखवून 1 लाख 42 हजार रुपये अतिरिक्त दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन विभागीय अधिकारी लिपिक आणि ठेकेदार अशा एकूण सहा जणांविरुद्ध सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
तब्बल 5 वर्षानंतर पाणी टँकर घोटाळा उघड झाला आहे. दरम्यान हा पाणीपुरवठा टँकरद्वारे 2016 ते 2018 या कालावधीत शहरात पाणीटंचाईवेळी करण्यात आल्याचे समजते. यावेळी शफी शेख आणि शिवानंद साखरे या दोन ठेकेदारांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे काम देण्यात आलेले होते. यात तत्कालीन विभागीय अधिकारी ए.व्ही. भालेराव, तत्कालीन ज्युनिअर इंजिनियर ए. पी. सावस्कर यांच्यासह कनिष्ठ लिपिकांनी ठेकेदारांशी संगनमत करून 1 लाख 42 हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन विभागीय अधिकारी लिपिक आणि ठेकेदार अशा एकूण सहा जणांविरुद्ध सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.