Home राजकीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात चूक; संशयित व्यक्तीला अटक

गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात चूक; संशयित व्यक्तीला अटक

0 second read
0
0
85

no images were found

गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात चूक; संशयित व्यक्तीला अटक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर येतेय. याप्रकरणी  मुंबई पोलीसांकडून 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान या व्यक्तीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी संशयितरित्या फेऱ्या मारल्या होत्या. याचवेळेस त्या व्यक्तीने अमित शहांच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला होता.

गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत येऊन गेले होते. पण, त्यांच्या या दौऱ्यामध्ये सुरक्षेत मोठी चुकू झाल्याचं समोर आले आहे. शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होती. पोलिसांनी या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. एकदिवशी दौऱ्यामध्ये त्यांनी लालबागचा राजा आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. पण, या दौऱ्यादरम्यान एक व्यक्ती शहा यांच्या जवळपास घुटमळत होती. या व्यक्तीचे नाव हेमंत पवार असं आहे. हा तरुण धुळ्यात राहणारा अस्ल्याची माहिती पोलिसांकडून समजते.

हेमंत पवारनं यापूर्वी आपण आंधप्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचं सांगून अमित शहा यांच्याजवळपास फिरत होता. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीनं मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असता तो धुळ्याचा असल्याचं वृत्त समोर आले. परंतु  हा तरूण संशयितरित्या का फिरत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…