
no images were found
मेसेज करून सतत त्रास देणाऱ्या मित्राला VIDEO कॉल करत तरुणीची आत्महत्या
औरंगाबाद : सतत पाठलाग आणि मेसेज करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेल्वे स्टेशन भागात घडली. बी.बी.ए.चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीने त्रास देणाऱ्या तरुणालाच व्हिडिओ कॉल करून आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अदिती दिनेश राठोड (वय -२० वर्ष, रा.रेल्वे स्टेशन परिसर, औरंगाबाद) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे, तर हेमंत ससाणे असं त्रास देणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
अदिती ही शहरातील विवेकानंद महाविद्यालयात बी.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. अदिती आणि आरोपी हेमंत पूर्वी मित्र होते. मात्र हेमंतच्या वागण्यामुळे अदितीने त्याच्यासोबत असलेली मैत्री तोडली होती आणि बोलणे बंद केले. मात्र तरीही हेमंतच्या वागण्यात बदल झाल नाही. तो सतत अदितीचा पाठलाग करायचा. तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवायचा. या सर्व प्रकराला वैतागून अदितीने या त्रासाबाबत काही महिन्यापूर्वी आईला कल्पना दिली होती.