
no images were found
मी पाच रूपयाचा घोटाळा केला असता तर ..; उदयनराजेंचा शरद पवारांवर निशाणा
सातारा : सातारा पालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे वाद रंगला असतानाच आता उदयनराजेंनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय. सातारा पालिकेत आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतंही गैर काम करत नाही, गैर खपवून घेत नाही. तसं असतं तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? असा सवाल करत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, पाच .रूपयाचा घोटाळा केला असता तर ते फोकस करून माझ्यावर आरोप केलं असते, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधलाय. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या आरोपाला त्यांच्याच शैलीत उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिलं. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावरही टीका केलीय. उदयनराजे पुढं म्हणाले, वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. पण, भ्रष्टाचाराचे स्पेलिंग मला माहिती नाही. तसे असते तर जे ज्येष्ठ विचारवंत जे माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची तरी त्यांना वाटली पाहिजे. सत्ता असो व नसो… नगरसेवकांपासून मी सुरवात केली.