Home शैक्षणिक नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड

नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड

1 second read
0
0
268

no images were found

नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई आणि सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागामध्ये बी.एस्सी.- एम.एस्सी. नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (५ वर्षांचा एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी कु. विशाल पांडुरंग भांदिगरे (रा. पुंगाव, कोल्हापूर) आणि कु. अनुषा सुरेश अगसिबागिल  (रा. कोल्हापूर) यांची संशोधन आणि विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तसेच कु. तेजश्री राजेंद्र जाधव (रा. आंधळी, सांगली) आणि कु. आकांक्षा अमरनाथ करंबळी (रा. मिरज, सांगली) यांची फाउंड्री उद्योगातील नामवंत सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि., कोल्हापूर व स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभाग यांच्या सहयोगी शोध प्रकल्पांतर्गत एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. किरणकुमार शर्मा व सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…