
no images were found
18 जिल्हे, तब्बल 1166 ग्रामपंतायतींची रणधुमाळी, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समजतेय. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत दसरा मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट, भाजप आणि मुख्य शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष तर अमरावतीत लव्ह जिहाद प्रकाराच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन तप्त राजकीय वातावरण अशातच पुढच्या महिन्यात आता ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. हजारो गावांमध्ये आता राजकीय रणधुमाळी अनुभवास येईल.