Home Uncategorized महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

3 min read
0
0
16

no images were found

महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर:  जागति क्षयरोग दिननिमित्त महापालिकेच्यावतीने क्षयरोग जनजागृती सप्ताह साजरा करण्या आला. त्यानुषंगाने फुलेवाडी येथे जागतिक क्षयरोग दिनी आरोग्य शिबीर व टीबी मुक्त भारत अभियान फेज-2 चा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्र उप-महापौर अक्षय जरग यांच्या अध्यक्षतेखाली, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋुतुराज क्षिरसागर, नगरसेविका सौ.संगिता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

            कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांचे प्रतिमा पूजनाने करण्या आल. यानंतर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली यादव यांनी प्रास्ताविकामध्ये जागतिक क्षयरोग दिननिमित्त शहर क्षयरोग कार्यालयाच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या क्षयमुक्त भारतचा उद्देश सफल करण्यासाठी टीबी मुक्त भारत अभियान फेज-2 अंतर्गत शहरातील जवळपास 60000 जोखिम ग्रस्त आणि सामान्य नागरीकांची आवश्यकतेनुसार क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. या कामी नागरीकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत गरीब आणि गरजु क्षयरुग्णांना उपस्थित मान्यवरांनी दत्तक घेऊन या मोहिमस सहकार्य करणेचे आवाहनही केले.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली यादव आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.कवठेकर यांच्या हस्ते करण्या आल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर जायंट्स ग्रुप ऑफ गोल्ड सहेली यांचेवतीने 5 क्षयरुग्ण दत्तक घेण्या आले. त्यानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरिता पवार आणि पदाधिकारी यांचा सत्कार उप-महापौर अक्षय जरग यांचे हस्ते करण्या आला.

प्रमुख उपस्थित नगरसेवक ऋुतुराज क्षिरसागर यांनी आपले मनोगतामध्ये क्षयरोग विभागाचेवतीने राबविण्या येत असलेल्या जनजागृती उपक्रमांचे कौतुक केले. या पुढे देखिल असे उपक्रम चालु ठेवुन क्षयमुक्त शहर करणेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणामध्ये उप-महापौर अक्षय जरग यांनी क्षयरोगाची भिती  बाळगता शासनाने सुचित केलेली लक्षणे दिसताच प्रत्येक नागरीकाने आपली क्षयरोगाची तपासणी करुन घ्यावी. तसेच क्षयरोगाचे निदान झाल्यास  घाबरता सत्वर क्षयरोग औषधोपचार सुरु करुन सहा महिने कालावधी नंतर तो पुर्णपणे बरा होणारा आजार आहे. शासनाच्या सर्व सुविधा पुर्णपणे मोफत पुरविल्या जातात. त्यामुळे सर्वांनी ही माहिती गरजु पर्यंत पोहचविली पाहिजे. तसेच क्षयरेागाचा प्रसार थांबविणेसाठी प्रत्येकाने एकमेकाला क्षयरोग विषयी जनजागृती करुन प्रवृत्त केले पाहिजे असे आवाहन केले.

त्यानंतर डि.के.शिंदे समाजकार्य विभाग, सायबर, कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचेवतीने क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर करणेत आले. त्यानंतर क्षयरोग विरोधी शपथ ग्रहण करणेत आली. यावेळी महानरगपालिकेच्या क्षयरोग विभागाकडील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…