Home Uncategorized पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

0 second read
0
0
17

no images were found

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

कोल्हापूर : सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर अवाहन करण्यात येते की, जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरुन जाऊन गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी व अनावश्यक साठवणूक करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे*.

युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा अनधिकृत साठा करणे किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकारच्या कोणत्याही हालचालींवर पुरवठा विभागाची करडी नजर असणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रामाणित कंटेनरमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधन साठवणे हे सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ते अत्यंत धोकादायक आहे.
प्रशासकीय आदेशांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत कोणत्याही वेळी ‘डमी ग्राहक’ पाठवून पेट्रोल पंपांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान जर एखादा पंप चालक बाटलीत इंधन देताना किंवा साठेबाजी व काळाबाजार करताना आढळल्यास, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संबंधित पंपचालक आणि ग्राहक या दोघांवरही कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची शिफारस देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे ही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…