
no images were found
मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सची हुतात्मा सहकारी बँक लि. वाळवा बँकॅश्युरन्स भागीदारी सुरू
सांगली : भारतातील सर्वात जलद वेगाने वाढणाऱ्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या मणिपाल सिग्न हेल्थ इन्शुरन्सने सांगलीतील प्रमुख सहकारी बँक असलेल्या हुतात्मा सहकारी बँक लि. वाळवा या बँकेसोबत धोरणात्मक बँकॅश्युरन्स भागीदारीची घोषणा केली आहे. विशेषतः सांगली आणि कोल्हापूर भागातील हुतात्मा सहकारी बँकेच्या ग्राहकांना सर्वांगीण आरोग्य विमा सेवा उपलब्ध करून देणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे.
या भागीदारीनुसार मणिपालसिग्नाच्या व्यापक श्रेणीतील आरोग्य विमा उत्पादने हुतात्मा सहकारी बँकेच्या व्यापक विस्तारातील सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच बँकेच्या ग्राहकांना किफायती आरोग्य विमा योजना पुरविण्यात येतील. त्यामुळे त्यांना वित्तीय सुरक्षा आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची हमी मिळेल.
मणिपालसिग्नाचे मुख्य वितरण अधिकारी शशांक चाफेकर म्हणाले, “महाराष्ट्रात दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये खोलवर मुळे असलेल्या आणि व्यापक ग्राहकवर्ग असलेल्या हुतात्मा सहकारी बँकशी सहकार्य करण्याचा आम्हाला आनंद आहे. या भागीदारीमुळे ग्रामीण भागात विम्याचा विस्तार लक्षणीय प्रमाणात वाढेल.त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा नेण्यास आम्हाला मदत होईल. या भागांमध्ये हुतात्मा सहकारी बँकेच्या दमदार उपस्थितीचा लाभ घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला आपला पाया विस्तारता येईल. त्यातून अनेक व्यक्ती व कुटुंबांच्या आरोग्य व क्षेमकल्याणाबाबत आम्हाला सकारात्मक प्रभाव पाडता येईल.”
हुतात्मा सहकारी बँकेचे चे संस्थापक – श्री .वैभव नागनाथ नायकवडी. म्हणाले, “मणिपालसिग्नाशी आमचे सहकार्य हा एक मैलाचा दगड आहे. आरोग्य विमा हा वित्तीय नियोजनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथे दर्जेदार आरोग्य सेवा मर्यादित असते. मणिपालसिग्नासोबत आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून त्यांचा बचाव होईल. तसेच अधिक आरोग्यदायी, अधिक सुरक्षित भविष्य निर्माण होईल.”
वैद्यकीय उपचारांचा खर्च सतत वाढत असल्यामुळे आरोग्य विमा असणे हे व्यक्तीला अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांमुळे आर्थिक जोखमीपासून बचाव करण्यासाठी मदत करते. सांगली आणि कोल्हापूर भागातील लोकांना विशिष्ट गरजेनुसार रचना करण्यात आलेले आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध करून देऊन मणिपालसिग्ना आणि हुतात्मा सहकारी बँकेने विम्याची स्वीकार्यता वाढवून ग्राहकांना आरोग्य विमा बाबत जागृत करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स उत्पादने आणि ऑफर याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://www.manipalcigna.com/health-insurance